Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

सुंदर माझे कार्यालय अभियान


शासनाच्या विविध कार्यालयात कार्यरत अधिकारी / कर्मचारी यांचा दिवसाचा भरपूर कालावधी कार्यालयात व्यतित केला जातो. कार्यालयातील वातावरण स्वच्छ, सुंदर व पोषक असल्यामुळे कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढते व त्याचा फायदा निश्चितपणे प्रशासनास व जनतेस होतो ही बाब लक्षात घेऊन शासनातर्फे "सुंदर माझे कार्यालय" अभियान  राबवण्यात येणार आहे.

पुढील आर्थिक वर्षापासून प्रत्येक वर्षी तालुका स्तर, जिल्हास्तर ,विभागस्तरावर राबवण्यास मान्यता देण्यात आली आहे.

सदर अभियान दरवर्षी तीन टप्प्यात राबविण्यात येईल.

दिनांक 1 जानेवारी ते 31 मार्च पहिला टप्पा

दिनांक 1 मे ते 31 जुलै दुसरा टप्पा

दिनांक 1 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर तिसरा टप्पा

सदर अभियानाचे विस्तृत नियोजन समजून घेण्यासाठी खालील शासन निर्णय अभ्यासा


Post a Comment

0 Comments

Ad Code