Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

Question tag and its basic rules with examples

 

QUESTION TAG ( प्रश्न सूचक शद्धसमूह)

Question Tag म्हणजे काय ? 

 वाक्याच्या शेवटी वाक्याचा मतितार्थ योग्य आहे किंवा नाही हे समजून घेण्यासाठी जो प्रश्न सूचक शब्दसमूह वापरतात त्यास Question Tag असे म्हणतात.

स्पष्टीकरण- Question Tag म्हणजे प्रश्न सूचक शब्द समूह पुरक प्रश्न किंवा उपप्रश्न होय. Question tag मध्ये प्रामुख्याने दोन व्यक्तीचा संबंध येतो एक बोलणारा व दुसरा ऐकणारा. बोलणाऱ्याच्या मताशी ऐकणारा सहमत असतो तेव्हा अशा विधाना वर बोलणाऱ्या कडून अधिक जोर दिला जातो. प्रामुख्याने चर्चा गप्पागोष्टी करतांना Q. T चा वापर करण्यात येतो.

उदा : तो नेहमी भांडत असतो, नाही का?

नाही का यालाच मराठीत उपप्रश्न असे म्हणतात.

                        अभ्यासाच्या दृष्टीने Q. T चे सर्वसाधारणत: तीन प्रकार पाडण्यात आले आहेत. ते पुढील प्रमाणे आहेत. 

१) सहाय्यकारी क्रियापदे असणारी वाक्ये 

२) सहाय्यकारी क्रियापदे नसणारी वाक्य 

३) आज्ञार्थी वाक्ये

Question Tag करण्याचे सर्वसामान्य नियम :

१) वाक्य जर होकारार्थी असल्यास तर Q. T. नकारार्थी करावा.

 २) वाक्य जर नकारार्थी असल्यास तर Q.T. होकारार्थी करावा.

३) Q. T. नकारार्थी करतांना not चे नेहमी n't असे अल्परूप करून लिहावे.

४) वाक्यात जर सर्वनाम असेल तर ते Q.T. मध्ये पुन्हा घ्यावे - सर्वनामें I, we, you, he she, it , they

५) जर दिलेल्या वाक्यात सर्वनाम नसेल तर वाक्यातील कर्त्याच्या लिंग वचनाला अनुसरुन सर्वनाम लिहावे.

i) कर्ता पुलिंगी असेल तर he घ्यावे.

ii) कर्ता स्त्रीलिंगी असेल तर she घ्यावे.

iii) कर्ता अनेकवचनी असेल तर they घ्यावे. 

iv) कर्ता नपुंसकलिंगी असेल तर it घ्यावे.

 v) कर्ता no one असेल तर any one घ्यावे.

 ६) Q. T. करणाऱ्या वाक्याच्या शेवटी स्वल्पविराम द्यावा आणि मग त्या वाक्या पुढे Q.T. जोडावा जोडावा.

 ७) शेवटी प्रश्नचिन्ह देऊन केलेल्या Q. T खाली अण्डरलाईन मारावी.

1)सहाय्यकारी क्रियापदे असणारी वाक्य :

 सहाय्यकारी क्रियापदे पुढीलप्रमाणे आहेत:

i) वर्तमानकाळी :

              am, is, are, have, has, can, do, does, may, must 

ii) भूतकाळी :

                was, were, had, could, did, might, must 

iii) भविष्यकाळी- 

               shall, will 

iv) भूत भविष्यकाळी- 

               should , would

नियम- वाक्यात जर वरील सहाय्यकारी क्रियापदे आली तर Q.T. मध्ये त्यांचा पुन्हा उपयोग ( वापर ) करावा.

1)Rama is working always, isn't he? 

2) It is not a geography class, is it?

3)We didn't go to him, did we?

२) सहाय्यकारी क्रियापदे नसणारी वाक्य :

नियम- वाक्यात जर सहाय्यकारी क्रियापदे नसल्यास Q. T. ची सुरुवात do, does किंवा dld ने करावी.

i) वाक्य वर्तमानकाळी असल्यास do किंवा does घ्यावे.

ii) वाक्य भूतकाळी असल्यास did घ्यावे. 

उदा- 

1) Hari meets his friend now, doesn't he?

 2) They visited the school, didn't they ?

3)आज्ञार्थी वाक्याचा Q.T.करणे :

नियम- आज्ञार्थी वाक्याच्या Q T. नेहमी will you असा करावा.

1) Bring me a hot cup of tea, will you?

2) Tell me you now, will you? 

3) Please come with me now, will you?

Solve the test number :1

Solve the test number : 2

Solve the test number :3

Solve the test number : 4

Solve the test number : 5

Solve the test number : 6

Solve the test number : 7

Post a Comment

0 Comments

Ad Code