Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

५वी मराठी कविता पुस्तके

                           १७. पुस्तके

पुस्तकं सांगतात गोष्टी युगायुगांच्या.

माणसांच्या जगाच्या,

वर्तमानाच्या -भूतकाळाच्या ,

एकेका क्षणाच्या !

जिंकल्याच्या-हरल्याच्या,

प्रेमाच्या-कटुतेच्या !

 तुम्ही नाही का ऐकणार 

गोष्टी पुस्तकांच्या ? 

पुस्तके काही करू इच्छितात, 

तुमच्याजवळ राहू इच्छितात. 

पुस्तकांत पाखरं चिवचिवतात. 

पुस्तकांत आखरं सळसळतात.

पुस्तकांत निर्झर गुणगुणतात.

पुस्तक परीकथा ऐकवतात.

 पुस्तकात रॉकेटचे तंत्र आहे, 

पुस्तकात विज्ञानाचा मंत्र आहे.

 पुस्तकांची दुनिया न्यारी आहे,

 ज्ञानाची उत्तुंग भरारी आहे! 

तुम्हांला नाही का जायचं ? 

पुस्तकांच्या विश्वात ?

 पुस्तकं काही सांगू इच्छितात,

 तुमच्या जवळ राहू इच्छितात.

मूळ कवी - सफदर हाश्मी (अनुवादित)

सौजन्य : बालभारती 

कवितेवर आधारित टेस्ट सोडवण्यासाठी या ओळीला स्पर्श करा.


Post a Comment

0 Comments

Ad Code