Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

परीक्षा ताण दृष्टिकोन exam tension positive thinking part 2

 परीक्षा .. ताण .. आणि दृष्टिकोन ! 

 भाग : २ 

 विद्यार्थी काय करू शकतो ?सर्वप्रथम स्वतःविषयी असणाऱ्या अवाजवी अपेक्षांचे ओझे कमी करा. 

आपल्या क्षमता ओळखून वास्तववादी अपेक्षा ठेवण्याचा प्रयत्न करा.

तुमचे द्येय निश्चित करा. 

यश सर्वानाच हवं असतं, परंतु त्यासाठी लागणारे परिश्रम  सातत्याने आणि प्रामाणिकपणे करण्याकडे लक्ष द्या. 

लक्षात ठेवा, अपेक्षित यश मिळेल का नाही यावर विचार करत बसण्यापेक्षा मी अपेक्षेप्रमाणे परिश्रम तर घेतोय ना यावर लक्ष ठेवा. 

मनातील गोंधळला गोंजारत न ठेवता, आता यावेळी मी काय केला पाहिजे त्यावर भर द्या. अभ्यासाची, दिनचर्येचे आखणी करू शकता. 

कोणत्या विषयाला किती वेळ देता येईल, कोठे जास्त लक्ष देण्याची गरज आहे याचे अवलोकन करून वेळापत्रक बनवा आणि ते प्रामाणिक पणे पाळा. 

या दिनचर्येत स्वतःच्या झोपे साठी, खाण्यासाठी योग्य वेळ द्या. 

बऱ्याच वेळा मुले रात्रभर जागरण करून, उपाशी राहून,अवेळी खाऊन फक्त आणि फक्त या शारीरिक आणि मानसिक तणावात अप्रयत्यक्षपणे वाढच करत असतात. 

स्वतःसोबत वेळ घालावावा, म्हणजे काय?

तर अशा गोष्टींसाठी वेळ काढा


ज्याने तुम्हाला फ्रेश वाटेल, उत्साही वाटेल. जसे खेळ खेळणे, वाद्य वाजवणे, गाणे ऐकणे, वाचन इ. परंतु टीव्ही, मोबाईल दूरच ठेवा. 


व्यायाम, दीर्घ श्वसन , मेडिटेशन एक उत्तम पर्याय आहे. तणावाला, विचारांना, काळजीला दूर ठेवून अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा. 

अभ्यासाची नेमकी कोणती वेळ असावी ?


हा प्रश्न सर्वांसमोर असतो. कोणी म्हणतो सकाळी अभ्यास करावा. कोणी सुचवते संध्याकाळी. परंतु  तुमच्या शाळेची वेळ काय आहे. यानुसार प्रत्येक विद्यार्थ्याच्या अभ्यासाची वेळ ही नक्कीच वेगवेगळी असू शकते. जर तुमची शाळा सकाळी असेल तर तुम्ही संध्याकाळची शांततेची वेळ अभ्यासासाठी निवडू शकता.

जेव्हा आपण अभ्यासाला सुरुवात करतो तेव्हा सुरुवातीला आपल्यात खूप उत्साह असतो म्हणून सुरुवात अवघड विषयापासून करा. सोप्पा विषय शेवटी घ्या. म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त वेळ अभ्यास करू शकता.

             शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या जवळच्या व्यक्तींशी सवांद साधणे. 


मन  मोकळेपणाने आपल्या पालकांशी, घरातील मोठे किंवा शिक्षकांशी आपल्या मनातील संभ्रमांविषयी, तणावांविषयी, अभ्यासात येणाऱ्या अडथळ्यांविषयी, मनातील परीक्षेच्या भीतीविषयी बोलणे. यामुळे तुम्हाला तणावातून, अनावश्यक विचारांमधून बाहेर येण्यासाठी मोठी मदत होऊ शकते. 

  क्रमशः 

( पुढील भागात पालक आणि शिक्षक यांची भूमिका यावर चर्चा करुया..)

सौ. नेहा पाटील - नलावडे 

Career Counsellor & Parenting Expert

Conatct : 9699445258

Post a Comment

0 Comments

Ad Code